Sad marathi status | sad marathi shayari

आज मी तुम्हाला Sad marathi status यांचा वरती सांगिल | मी आशा ठेवतो का तुम्हाला हा Sad marathi status नक्कीच आवडील | जर तुम्हाला हा Sad marathi status आवडतो तर तुम्ही एक वेळा हा Emotional marathi status किंवा वाचा |

Sad marathi status

नेहमीच आनंद मिळेल असे नाही,
कधी कधी दुःख पण सोसावे लागते,
कितीही अहंकारी असाल तरीही,
प्रेमात मात्र कधी ना कधी झुकावेच लागते

sad-marathi-status

प्रेमात एकदा खाल्ला धोका,
आता प्रेमात पडायची इच्छाच नाही,
आता जीवनात फक्त हसत आणि हसवत रहायचय,
आता परत रडायची इच्छाच नाही

मला एक सांग,
तु परीक्षा घेत आहेस माझ्या सहनशीलतेची की
खरोखरच तुला माझी
आठवण येत नाही

नाही आठवण काढलीस तरी चालेल,
पण विसरून मात्र जाऊ नकोस.

तू मला सोडून गेलीस
आता मी कोणालच दोष देऊ शकत नाही
कारण बघ न माझे हृदय पण
सर्वात मोठे धोकेबाज निघाले
ते पण फ़क़्त तुझ्यासाठी धडधडत आहे .!

sad marathi shayari

माझ्या जीवनात, मी जगलो,
मी प्रेमात पडलो, मी हरलो,
मला नाकारलं, मी दुखावलो,
मी विश्वास ठेवला, मी चुका केल्या,
पण सगळ्यात जास्त मी शिकलो

sad-marathi-status

तिला जायचं होत ती गेली
मला गमवायच होत मी गमावलं,
फरक फक्त एवढाच,
तिने जीवनाचा एक क्षण गमावला
आणि मी एका क्षणात जीवन.

जेव्हा आपली नखं वाढतात तेव्हा
आपण नखं कापतो बोटं नाही
त्याच प्रमाणे जेव्हा गैरसमजातून
नाती तुटायची वेळ येते तेव्हा
अहंकार तोडा नाती नाही.

आपली काळजी करणाऱ्या माणसाला गमावू नका
एखाद्या दिवशी जागे व्हाल, तेव्हा कळेल की
तारे मोजण्याच्या नादात आपण चंद्रच गमावून बसलो.

नाही म्हणालीस जरी तू,
नाही दुखी होणार मी,
जगत होतो, जगत आहे,
जगतच राहणार मी.
आता निरोप घेतो दुःखी नको होऊस
तुजसमोर नाही पुन्हा येणार मी.

Sad marathi status

येवढे तरी माझ्यावर उपकार करुन बघ,
माझ्या डोळ्यातील आसवांतल्या
वेदना ओळखून बघ.

जीवनात जोडलेली नाती
कधी तोडायची नसतात.
छोट्याश्या वादळानं
विश्वासाची घर मोडायची नसतात.

मागितली होती फक्त तुझी साथ,
तु तर सोडून गेलास हातातला हात,
म्हणूनच आता तुझ्याकडे माझे काहीच मागणे नाही,
पण तुझ्याशिवाय जगणे म्हणजे काहीच जगणे नाही !

जे जगतात ते प्रेम करतात
आणि जे जळतात ते लफडं
म्हणतात.

प्रेमाची खरी किंमत
ते दूर गेल्यावर कळते,
कितीही दुर्लक्ष केले तरी,
नजर मात्र तिथेच वळते.

sad marathi shayari

नशिबात आणि हृदयात फक्त एवढाच फरक असतो,
जो हृदयात असतो तो नशिबात नसतो
आणि
जो नशिबात असतो तो हृदयात नसतो

sad-marathi-status

तुझ्यासाठी खूप सोपे असेल मला विसरणं,
पण माझ्यासाठी खूप कठीण आहे,
तुला विसरून जगणं…!!!

कधी कधी वाटतं माझा जन्म फक्त आणि
फक्त त्रास सहन करण्यासाठीच झालायं.

प्रेमात हरलात म्हणुन स्वत:ला दोष देत बसु नका
कदाचित देवाने त्याही पेक्षा ही चांगली प्रेम करणारी
व्यक्ती तुमच्या नशिबात लिहुन ठेवली असेन

प्रेम त्याच्यावर करा,
ज्याचे ह्रदय आधीच तुटलेले आहे,
कारण ह्रदय तुटण्याचे दुःख,
त्याच्याइतके कुणालाच माहित नसते

Sad marathi status

‘मन गुंतायला’ हि वेळ लागत नाही
आणि,
‘मन तुटायला’ हि वेळ लागत नाही..
वेळ लागतो फक्त,
ते गुंतलेले मन आवरायला
आणि,
‘तुटलेले मन सावरायला’

किती तरी खेळणी आहेत खेळण्यासाठी,
पण, शेवटी ती माझ्या भावनांशीच खेळली!

शरीराला जखम झाली तर रक्त बाहेर येते,
पण अश्रूंना बाहेर पडण्यासाठी,
मनाला जखमी व्हावी लागते.

मन गुंतायाला हि वेळ लागत नाही
आणि मन तुटायला हि वेळ लागत नाही
वेळ लागतो फक्त ते गुंतलेले मन आवरायला
आणि तुटलेले मन सावरायला.

गमावलं मी पण होतं,
गमावलं तिने पण होतं,
फरक फक्त एवढा आहे??
तिला मिळविण्याकरीता मी सर्व काही गमावलं,
अन,
तिने सर्व काही मिळविण्याकरीता मला गमावलं

sad marathi shayari

कुणाला कितीही आपण
आपलं मानलं तरीही,
शेवटी ते परकेच ठरतात.

मी तुझ्या आयुष्यातून निघून जावं,
ही तुझी इच्छा होती
आणि,
तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण व्हाव्यात,
ही माझी इच्छा होती..!!

गळून गेलेल्या पाकळ्या
जशा पुन्हा जुळत नाही,
तसेच
मनातून उतरलेले काहीजण
पुन्हा मनात भरत नाहीत…!!

आज किनाऱ्यावर प्रत्येक लाट
चिंब चिंब भिजली होती,
तेव्हा आठवले कुशीत माझ्या
येऊन तू निजली होती.

पाऊस आज खूप रडला
माहित नाही मला कोणावर रुसला
कदाचित त्यालाही आठवत असेल
त्याचे ओघळलेले थेंब
त्याने सुद्धा केले असेल कोणावरतरी खरे प्रेम.

Sad marathi status

विसरून जा तिला जी तुला विसरेल,
बघू नकोस तिला जी तुला रडवेल,
पण चुकूनही दूर जाऊ नकोस
तिच्यापासून जी स्वतः रडून
जी तुला हसवेल.

जर तुम्हाला रिजेक्ट,
अस्वीकार केलं तर निराश होऊ नका.
सर्वसाधारण लोक महागड्या वस्तू रिजेक्ट करतात
त्या स्वीकारण्याची त्यांची ऐपत, लायकी नसते.

थांब इथून पुढे मला एकट्यालाच जायचंय,
पण धन्यवाद !
तू इथवर आलीस,
सारे आयुष्य नसलीस तरी,
चार पाऊले माझी झालीस

सोडुन मला त्याने हसत राहण्यास सांगीतले.मी पण हसत राहीले
प्रश्न त्याच्या आनंदी राहण्याचा होता,
मी जे हरवल ते कधिच माझ नव्हत
पण त्याने जे हरवल ते फक्त त्याचेच होत
फक्त त्याचेच

तुझ्या डोळ्यात अश्रू येतील
असे मी कधीही वागणार नाही कारण
तुझ्या अश्रूची किंमत
मी कधी चुकवू शकणार नाही.

sad marathi shayari

जगातील सर्वात मोठी वेदना म्हणजे,
आपण ज्या व्यक्तीवर सर्वात जास्त प्रेम
करतो तिच्या शेजारी बसने.
आणि, ती व्यक्ती कधीही आपली होणार
नाही याची जाणीव होणे.

sad-marathi-status

जगात खूप गोष्टी आहेत,
खेळण्यासाठी..
पण तुला माझ्या भावनाच
आवडल्या का,
खेळण्यासाठी

शब्दातून दुःख व्यक्त करता आले असते,
तर अश्रुंची गरज भासली नसती
सर्व काही शब्दात सांगता आले असते
तर भावनांना किंमतच उरली नसती.

विसरायचे म्हटलं विसरताही येत नाही,
तुझ्यावीना एक क्षण राहताही येत नाही.

आयुष्यात वाईट तेव्हा वाटते,
जेव्हा आपण काही चुका करतो,
पण सर्वात जास्त वाईट तेव्हा वाटते जेव्हा,
त्या हजार चुका आपण
एका चुकीच्या व्यक्तीसाठी करतो.

Sad marathi status

तुझ्या साठी बघ मी,
किती मोठ्ठं मन केलं.!
तुला आवडतं खेळायला म्हणून
हृदयाचं खेळणं केलं

प्रेम मी हि केलं, प्रेम तिने हि केलं
फरक फक्त एवढाच होता कि
मी प्रेम केलं तिला मिळवण्यासाठी
तिने प्रेम केलं वेळ घालवण्यासाठी.

आज स्वप्नातही अबोला
तुझा नाही सुटला ..
तुला समजावण्याच्या नादात
माझ्या अश्रूंचा बांध मात्र फुटला ..

कोण कोणाचे नसते हे अगोदर समजले असते,
तर हे तुटणारे नाते,
मी कुणाशी जोडलेच नसते

तू आणि मी समुद्राचे दोन किनारे
कधी हि भेटू न शकणारे
पण एकमेकांवर जीवापाड प्रेम करणारे.

sad marathi shayari

sad-marathi-status

तिच्या डोळ्यात पाहिले तेव्हा समजले,
प्रेम कशाला म्हणतात,
आणि सोडून गेली तेव्हा समजले,
खरे प्रेम कशाला म्हणतात

रक्तापेक्षा अश्रू श्रेष्ठ असतात
कारण शरीराला जखम झाली तर रक्त बाहेर येते,
पण अश्रूला बाहेर येण्यासाठी मनाला जखमी व्हावे लागते

एखादी व्यक्ती कितीही कामात व्यस्त असली तरी
जर तीला मनापासून बोलायचं असेल ना तर ती
वेळात वेळ काढून निदान ५ मिनीटे तरी निवांत बोलू शकते

नाती तोडली नाही पाहिजेत हे खरं आहे,
पण जेथे आपली कदरच नाही
ती नाती टिकवूनही काही उपयोग नाही.

मी तुला मिळवत असतांना,
तु मला कुठेतरी गमावत होतीस,
मी तुझ्या नजरेत भरतांना मात्र,
तु माझ्या नजरेतून उतरत होतीस

जवळची नाती ही माणसाला,
कधी कधी खूप छळतात,
जितके जास्त जपाल तितके,
आपणाला आणखी दुर लोटतात

sad marathi shayari

किती छान होतं रे आपल नात,
कोणास ठाऊक, कोणाची
नजर लागली आपल्या नात्याला,
उडून गेली ती स्वप्ने.
संपला राजा राणी चा खेळ.
मोडली आपली कहाणी अर्ध्यावर.
तुजवीण शोन्या राहिले मी अधुरी.

कुणी तुला विसरेल तर काय करशील?
सगळ्या आठवणी मिटवेल तर काय करशील?
कुणाला सोडण्यापूर्वी एकदा विचार नक्की कर
कुणी तुला सोडले तर काय करशील?

मला याच अजिबात वाईट वाटत नाही
की तू माझी नाही झालीस,
सुख तर या गोष्टीच आहे कि
कधीतरी तू माझी होतीस.

जाऊदे तिला मला सोडून
दुसऱ्याच्या मिठी मध्ये
तसेही एवढ प्रेम करूनसुद्धा
जी माझी नाही झाली,
दुसऱ्याची तरी कशी होणार?

कधी आयुष्यात आलीस
अन कधी माझी सवय झाली
काही कळलेच नाही,
एक एक दिवस जात होता
अन एक एक आठवण
मनाच्या पटलावर तरंगून जात होती.

Sad marathi status

बोल ना ग आता
झोप गेली लांब तीरावरी,
बोलली नाहीस की
नाही करमत मझला तुझ्यापरी..

जाता जाता ती सांगून गेली,
काळजी घेत जा स्वतःची,
पण तिचे डोळे सांगत होते की,
आता माझी काळजी कोण घेणार?

खुप काळजी घेणारेच आपल्याला रडवून जातात,
कितीही मनापासून प्रेम करा,
तुझ्याशिवाय जगु शकत नाही,
असे म्हणणारेच एक दिवस सोडून निघून जातात

आयुष्य हे अपेक्षांनी भरलेले आहे,
कोणाची अपेक्षा पूर्ण होते तर कोणाची अधुरी राहते
जिला मी मागितले देवाकडे प्रार्थने मध्ये,
ती दुसर्याला न मागता मिळून जाते

प्रेमाचं सारं कर्ज फेडलंय मी..
हिशोब उरलाय तो फक्त,
तू दिलेल्या जखमांचा…

sad marathi shayari

एकदा सोडून गेली आहेस
परत माझ्या आयुष्यात येऊ नकोस
हे हृदय तुझ्यावर परत एकदा
प्रेम करण्याची चूक करुन बसेन

कुणावर कितीही प्रेम करा पण जर
समोरच्याला आपली सोबत नको असेल ना,
तेव्हा आपली लहानशी
चुकी पण पुरेशी असते नातं तुटायला

ज्या क्षणी तुला वाटेल कि,
हे नात तोडण्याची वेळ आली आहे
तेव्हा स्वतःच्या मनाला हे एकदा जरूर विचार कि,
हे नात एवढा काळ का जपलं..का जपलं

पुन्हा भेटशील अश्याच एका वळणावर
तेव्हा असेल तुला माझी आस
कळेल तुला खरं प्रेम होत माझं
नव्हता तो फक्त टाईमपास.

मीच मुर्ख होतो जे तुला
माझ्या आयुष्यातल्या प्रवासातला
जोड़ीदार समजून बसलो,
तू चालत तर माझ्या सोबत होतीस पण
तुझे डोळे दुसऱ्याच कोणाच्या शोधात होते.

Sad marathi status

प्रेम कोणावर करायचे?
जो आपल्याला आवडतो त्याच्यावर की
ज्याला आपण आवडतो त्याच्यावर
मन वेधून घेणाऱ्या गुलाबावर की
त्याला जपणाऱ्या काट्यावर.

जेव्हा तुमची जवळची व्यक्ती
तुमच्यावर रागवायची बंद होते
तेव्हा समजून जा
तुमची त्यांच्या आयुष्यातली
महत्वाची जागा गमावलीत.

आज माझ्याच सावलीला विचारलं मी,
का चालते तू माझ्यासोबत..
सावलीने पण हसत उत्तर दिलं,
कोण आहे दुसरं तुझ्या सोबत

तुला आताच सांगून ठेवते
प्रेम म्हणजे मंत्रालयातील फाईल नाही
कि जाळली आणि मिटवलं सगळं.

चेहऱ्यावर नेहमीच हसू,
पण मनात खूप काही साठलेलं.
आले जरी डोळे भरून,
ते कोणालाही न दिसलेलं !

sad marathi shayari

तुमच्या ex ला दुसऱ्याबरोबर
बघून कधीच जेलस फील करू नका,
कारण आपल्या मोठ्यांनी आपल्याला
शिकवलेलं आहेच कि
आपण खेळून झालेली खेळणी
दुसऱ्या गरिबांना वाटत जा.

आवडत्या व्यक्तीला
आपल्या इगोसाठी सोडण्यापेक्षा,
आवडत्या व्यक्तीसाठी
इगो सोडणं केव्हाही चांगलं.

तू माझी होतीस तेव्हा मी तुझा होतो,
अन आता तू माझी नाहीस तरीही मी तुझाच आहे.
फरक फक्त एकच आहे
मी केलं त्याला प्रेम म्हणतात अन तू केलं त्याला सौदा.

मी मनसोक्त रडून घेते,
घरात कुणी नसल्यावर
मग सहज हसायला जमतं,
चारचौघात बसल्यावर

माझ्यापासून दूरच जायचंय,
तर खुशाल जा..
फक्त एवढंच लक्षात ठेव,
पुन्हा मागे वळून बघायची
मला पण सवय नाही…

Sad marathi status

माहिती आहे तुझ्या नजरेत मला,
काहीच किंमत नाही…
पण माझी किंमत त्यांना विचार,
ज्यांना मी वळून सुद्धा पाहत नाही

कुठेही रहा पण सुखात रहा,
सुख माझे त्यात आहे,
स्वतःचा जीव जपत रहा,
कारण जीव माझा तुझ्यात आह

जे मी केलं आणि का केलं,
ते तुला कधीच समजणार नाही
आणि,
समजू पण देणार नाही,
पण जे काही केलं ते
फक्त तुझ्यासाठीच केलं

माणसाचे आयुष्य जीवनात दोन वेळा नक्की बदलते,
कुणीतरी खास व्यक्तीने जीवनात प्रवेश केल्यावर,
आणि कुणीतरी खास व्यक्ती नकळत सोडून गेल्यावर

तू माझ्याशी प्रेम कर अथवा तिरस्कार,
दोन्ही माझ्याच पक्षात येईल,
जर तू माझ्याशी प्रेम करशील तर,
मी तुझ्या हृदयात असेल,
अणि जर तू माझ्याशी तिरस्कार करशील तर,
मी तुझ्या मनात असेल

sad marathi shayari

माझ्या अश्रूंची किंमत
तुला कधीच नाही कळली
तुझ्या प्रेमाची नजर
नेहमीच दुसरीकडे वळली

ह्या हृदयालाच माहिती आहे
माझ्या प्रेमाची स्थिती,
कि मला जगण्यासाठी श्वासाची नाही,
तुझ्या विश्वासाची जरुरत आहे.

कधी कधी खूप
दूर पर्यंत जावं लागतं.
हे बघण्यासाठी कि,
आपलं जवळचं कोण आहे

रहा तु कुठेही,
पण जप मात्र स्वतःला..
आडोशाला उभे राहून,
पाहीन मी तुझ्या सुखाला

Sad marathi status

काच बनविणाऱ्याने जर हृदय पण
काचेच बनविले असत तर फार बर झालं असत,
कमीत कमी तोड्ण्याराच्या
हाताला जखम तरी झाली असती.

जो या वेड्या मनाला बऱ्याचदा रडवतो,
तो वेडाच या मनाला खूप खूप आवडतो.

परकचं करायच होत
तर जवळ का गं घेतलस ?
विश्वासच नव्हता तर
प्रेम का गं केलस ?

वेळ तर प्रत्येक जखमेवर मलम लावते..
पण एवढं लक्षात ठेव,
आज तू मला विसरलीस,
उद्या तुला कोणीतरी विसरेल…!

एके दिवशी माझा श्वास बंद होईल
नको विचार करूस कि माझे प्रेम कमी होईल
अंतर फक्त एवढंच असेल
आज मी तुझी आठवण काढत आहे.
उद्या माझी आठवण तुला येईल.

मी आशा ठेवतो का तुम्हाला हा Sad marathi status नक्कीच आवडला असेल |

Leave a Comment