Marathi love shayari | प्रेमाची शेर शायरी

आज मी तुम्हाला Marathi love shayari याचा वरती सांगिल | मी आशा ठेवतो का तुम्हाला हा Marathi love shayari नक्कीच आवडील | जर तुम्हाला हा Marathi love shayari आवडतो तर तुम्ही एक वेळा हा Love marathi status किंवा वाचा |

Marathi love shayari

“तुझ्यासाठीच मला
सागर बनायचं आहे
तुझ्यासाठीच मला
मोती होऊन राहायचं आहे ….”

marathi-love-shayari

“बघता बघता बघ कशी
माया तुझ्यावर जडली
आणि मनावर माझ्या प्रेमाची
लकेर तू ओढली..

“तुझं ते रुप खरचं माझ्या ङोळ्यांना
आंधळ करून जात असतं
तू दूर असशील तरी
माझ्या जवळ आहेस
याची जाणीव करून देतं असतं…”

“तूझ्या कुरळ्या केसांना सावरत,
तिरक्या नजरने पाहिलसं मला…
अन् माझ्या मनाला लागलं ध्यास,
आता बनवायचं माझं फक्त तुला…”

प्रेमाची शेर शायरी

marathi-love-shayari

“तुझा तो पहिला स्पर्श
आजही मला आठवितो..
ते दुर्मिळ रोमांचीत क्षण
आजही मनात साठवितो….”

“स्पर्श तुझा व्हावा,
अन देह हा माझा लाजून चूर व्हावा…
हक्काने मिठीत तू घ्यावेस,
जसा पाण्यावरी स्पर्श चांदण्याचा असावा…”

marathi-love-shayari

“तुझ्या प्रेमात मी इतका हरवलोय की,
मलाच मी सापडत नाही..
एकटा शोधावा म्हटलं,
पण तुझ्याशिवाय काहीच सापडत नाही..”

“तु माझ्या सोबत असलीस की,
एकटक तुला पाहावेसे वाटते..
तु मला पाहुन हसलीस की,
तिथेच तुझे पुन्हा व्हावेसे वाटते..

Marathi love shayari

marathi-love-shayari

“अशाच एका वळणावरती
तुझी-माझी भेट झाली…
तेव्हापासून या ह्रदयाला तुझ्या
भेटीची ओढ लागली..”

“निळाईच्या गर्द ह्रदयात
एकदातरी सामावून घेशील का ?
आकाशाचं स्वप्न नको मला
एकदातरी आपलं म्हणशील का ?

“झोंबते ही गार हवा
बघ कसा माझ्या तनी..
सांगु कसे साजना तुजला
मज आता लाज येते मनोमनी…”

गुलाब शायरी मराठी

marathi-love-shayari

“प्रेम काय आहे ‪
माहिती‬ नाही मला
पण ते ‪तुझ्याइतकच‬
सुंदर असेल तर
प्रत्येक जन्मी‬ हवय मला…”

“जेव्हा जवळ यायचा तू
श्वास माझा फुलायचा
अन तुलाच पाहावेस वाटायचे
तुझ्या मिठीत हरवून जावे वाटायचे
तुला प्रेम करत तुलाच
स्वाधीन होऊन जायचे….

“ओंजळीतले क्षण
केवळ प्रेमाचे होते..
नकळत आवडलेलीस तू
माझे मलाच कळले नव्हते..”

“चंद्राचा तो शीतल गारवा,
मनातील तो प्रेमाचा पारवा..
ह्या नशिल्या संध्याकाळी,
हात तुझा हाती हवा…

“तू मला खूप आवडतेस,
बोलण्याकरिता जीभ ही वळत नाही..
जेव्हा असतं बोलायचं,
तेव्हा ओठांना शब्दचं मिळत नाही..”

Marathi love shayari

“तुझ्यासाठी जीव देणारे तुला खूप भेटतील..
पण माझ्या सारखा जीव लावणारा
एक पण नाही मिळणार..”

प्रेम ही एक अशी गोष्ट आहे की
ती ठरवून होत नाही ग
त्यासाठी दोन व्यक्तिची
मने जुळावी लागतात

“जवळीक साधून माझ्याशी..
कशी किमया केलीस…
वेड लावून माझ्या मनाला
तु का निघून गेलीस…”

तु आहे म्हणून तर,
सगळं काही माझं आज आहे..
हे जग जरी नसलं तरी,
तुच माझ्या प्रेमाचा ताज आहे…!!!

तू माझ्यावर प्रेम करत नाही
म्हणून काय झालं
मी तुझ्यावर जीवापाड प्रेम करतो

मराठी लव शायरी sms

तुझ्यासाठी जीव देणारे तुला
खूप भेटतील
पण माझ्या सारखा जीव लावणारा
एक पण नाही मिळणार…

माझ्या आयुष्याची पतंग खूप उंचावर उडेल
जेव्हा माझं पिल्लू
माझी फिरकी पकडायला
माझ्या बरोबर उभी असेल…

एवढा कसा बदलोय मी
अग वेडे तुटलेल्या फुलाचा रंग बदलणारंच ना..

मलाही वाटतं
तुझ्या हातात हात घालून
तुझ्या खांद्यावर डोके ठेवून
शांत बसावं.

मला इतकंच म्हणाच आहे तू लाख लोकांसी बोल
पण मला दिवसातून एक msg किव्हा एक call जरी करशील
मला पण बरं वाटेल
आठवण काढणार कोणीतरी आहे

Marathi love shayari

जर खरं प्रेम असेल,
तर दुसरा कोणता
व्यक्ती आवडत नाही..
आवडलाच तर ते खरं
प्रेम नाही

तीच नकळत चोरून बघणं
पण
मनाला एकदम वेड लावून जात यार

काळाच्या ओघात कळालेच नाही,
आयुष्य कसे कुठे फाटले,
तू भेटलीस आणि
जरा जगावसं वाटले…”

“खरं ‪प्रेम‬
खुप ‪जवळ‬ असतं..
फक्त त्याला शोधणारी ‪नजर‬
जवळ असली पाहिजे…”

“कळलंच नाही मला,
प्रेम तुझ्यावर कसं झालं..
मी फक्त जीव लावला,
हृदय केव्हाच तुझं झालं..”

प्रेमाची शेर शायरी

“पापण्यात लपलेली तुझी नजर,
माझ्याकडे बघुन लाजत आहे..
तुझ्या पायातील पैजणसुद्धा,
माझ्याच नावाने वाजत आहे…”

“डोळ्यांत तुझ्या पाहिलं की,
आरश्यात पहावसचं वाटत नाही
हृदयात तुझ्या राहते मी,
आणि आत्ता घरी रहावसचं वाटत नाही..”

“तुझं माझं भेटणं
विधिलिखितच होतं..
नक्कीच तुझं माझं
साताजन्माच नात होतं…”

“तुझ्या तळहातावरच्या रेषा
मी डोळे भरून पाहतो..
कारण माझ्या स्वप्नांचा झरा
त्या रेषांमधून वाहतो….”

Marathi love shayari

“गालावरची खळी
रोजच हसते
तू हसल्यावर ती
अजूनच खुलते

तुला तुझं पहिले प्रेम विसरता येईल कि नाही माहित नाही
पण असे काही क्षण देऊन जाईल कि
माझ्याशियाय दुसरं कोणी आठवणारच नाही…

प्रेयसी लोकल सारखी असावी
नेहमी लेट येणारी
पण तिच्याशिवाय option नसणारी…

कितीही रुसलीस कितीही रागावलीस
तरी
माझं तुझ्यावरच प्रेम कमी होणार नाही….

गोड आठवणी आहेत तेथे,
हळुवार भावना आहेत,
हळुवार भावना आहेत तेथे अतूट प्रेम आहे,
आणि जेथे अतूट प्रेम आहे,
तेथे नक्कीच तू आहेस……

“फसवून प्रेम कर,
पण प्रेम करून फसवू नकोस,
विचार करून प्रेम कर,
पण प्रेम करून विचार करू नकोस,
हृदय तोडून प्रेम कर,
पण प्रेम करून हृदय तोडू नकोस…..”

तू माझ्याशी प्रेम कर अथवा तिरस्कार..
दोन्ही माझ्याच पक्षात येईल..
जर तू माझ्याशी प्रेम करशील
तर मी तुझ्या हृदयात असेल..
अणि जर तू माझ्याशी तिरस्कार करशील
तर मी तुझ्या मनात असेल……

लव शायरी मराठी डाउनलोड

आकाशाला टेकतील असे हात नाही माझे,
सगळं काही साठून ठेवतील असे डोळे नाही माझे,
पण तुझे प्रेम साठून ठेवेन
एवढे हृदय नक्कीच आहे माझे…

तुझं हे एक बरं असतं,
थोडंसं रडतेस..
बाकी सारं काही
माझ्यावर सोडतेस

तु आहे म्हणून तर,
सगळं काही माझं आज आहे..
हे जग जरी नसलं तरी,
तुच माझ्या प्रेमाचा ताज आहे……

जिवापाड प्रेम केल्यावर कळते कि प्रेम म्हणजे काय असते,
तुम्ही प्रेम कोणावरही करा पण,
ज्याच्यावर कराल ते अगदी शेवटपर्यंत करा,
कारण प्रेम हे मौल्यवान असते……

सवय लागलीय तुझ्यावर प्रेम करायची,
सुटता सुटेना..
शेवटी ठरवले विसरून जायचं तुला,
पण तुझ्यावाचून जगणं ही जमेना…

Marathi love shayari

प्रेम त्याच्यावर करावे,
ज्याला आपण आवडतो,
नाहीतर आपल्या आवडीसाठी,
आपण उगाच आयुष्य घालवतो……

विसरून जा तिला जी तुला विसरेल,
बघु नकोस तिला जी तुला रडवेल,
पण चुकूनही दूर जाऊ नकोस तिच्यापासून,
जी स्वतः रडून तुला हसवेल…..

तुझ्यावर मनापासून प्रेम करतोय मी,
आता तुलाच माझे सर्वस्व मानतोय मी,
आता फक्त माझ्या पासून दूर जाऊ नकोस तू,
कारण माझे सुंदर आयुष्य आहेस तू,
माझे पहिले अन शेवटचे प्रेम आहेस तू…..

वेडा होतो तुझ्या मिठीत,
यात माझा काय गुन्हा..
तू आहेसच एवढी गोड म्हणून,
ओठांशी लावतो पुन्हा पुन्हा…..

आयुष्य हे एकदाच असते,
त्यात कोणाचे मन दुखवायचे नसते,
आपण दुसऱ्याला आवडतो,
त्यालाच प्रेम समजायचे असते……

प्रेमाची शेर शायरी

प्रेमाच्या या प्रेमळ हृदयात…
आज अचानक धडधड झाली….
डोळे भरले पाण्यांनी आणि पुन्हा तुझी आठवण आली…

तिच्याच साठी मी, रोज एक कविता करावी….
तिने ती माझ्याच समोर वाचावी,
अन वाचून झाल्यावर, मला पाहून…
हळूच ती लाजावी….

प्रेमात जरा रागावल्याशिवाय,
प्रेमाला गोडी येणार नाही..
आणि रागावून दूर गेल्याशिवाय,
त्या भेटीचे महत्व तुला कळणार नाही…..

एखादयाशी हसता हसता
तितक्याच हक्कानं रुसता आलं पाहीजे,
समोरच्याच्या डोळ्यातलं पाणी अलगद पुसता आलं पाहीजे,
मान अपमान प्रेमात काहीच नसतं,
आपल्याला फक्त समोरच्याच्या ह्रदयात राहता आलं पाहिजे…..

मला आवडलेली सर्वात सुंदर परी म्हणजे तू
जगांत भारी नाही
पण माझं जग भारी करणारी आहेस तू …

Marathi love shayari

जो व्यक्ती खूप भांडणे करूनही
तुम्हाला मनवायची क्षमता ठेवतो.
समजून जा कि तोच व्यक्ती,
तुमच्यापेक्षा तुमच्यावर जीवापाड प्रेम करतो…..

माझं प्रेम,
तुझ्या अगोदरही कुणी नव्हतं.
तुझ्या नंतरही कुणी नसेल,
जो पर्यंत,
श्वासात श्वास आहे,
माझं प्रेम फक्त तुझ्यावरच असेल…..

कधी येईल तो दिवस तु एका क्षणात समोर ‪येशील आणि,
म्हणशील मी ‪‎तुझ्याशिवाय जगुच ‪शकत नाही…

आयुष्यभर कोणासाठी थांबणे
म्हणजे प्रेम,
कोणीतरी सुखात असल्याचा आनंद
म्हणजे प्रेम,
कोणासाठी तरी रडणारे मन
म्हणजे प्रेम,
आणि कोणाशिवाय तरी मरणे
म्हणजे प्रेम…..

प्रेम केलं ज्याच्यावर
त्याच्याशीच लग्न करणार..
नाही म्हणलं तर त्याला
मंडपातून मी पळवून आणणार……

गुलाब शायरी मराठी

मला तुझं हसणं हवं आहे,
मला तुझं रुसणं हवं आहे,
तु जवळ नसतांनाही,
मला तुझं असणं हवं आहे……

तुझी साथ आणि थोडा वेळ दे मला,
मी आयुष्यात असे काही बनेन की
आपल्या लग्नात आपली caste आडवीच नाही आली पाहिजे….!!

तुझ्यासोबत सजवलेले स्वप्नांचे घर,
मी कधीही तोडणार नाही,
तु ये अथवा नको येऊ,
मी तुझी वाट पाहणे सोडणार नाही….

भीत तर कुणाच्या बापाला पण नाही रे..
पण तुला चोरून पाहण्यात एक,
वेगळीच मजा येते….

marathi love shayari

तुझी आठवण येणार नाही
असे कधीच होऊ शकणार नाही.
कारण मी तुझ्याशिवाय कुणावर..
प्रेमच केलंच नाही….!!

जगातील सर्वात सुंदर गोष्ट….
म्हणजे प्रेम
जि सहसा मिळत नाही…

कधी येईल तो दिवस तु एका क्षणात समोर ‪येशील आणि,
म्हणशील मी ‪‎तुझ्याशिवाय जगुच ‪शकत नाही…..

जगातील सर्वात सुंदर गोष्ट….
म्हणजे प्रेम
जि सहसा मिळत नाही

“खुप त्रास होतोय
दुरावा झाला की
पण कसं कळणार
प्रेम खोट समजत असेल तर”

“काही मुल असतात ‪वेडी‬
एकतर्फी प्रेम करणारी..
किती ही ‪‎त्रास‬ दिला तिने,
तरी तिच्यावरच मरणारी

मी आशा ठेवतो का तुम्हाला हा Marathi love shayari नक्कीच आवडला असेल |

Leave a Comment