लोकमान्य टिळक निबंध मराठी | Lokmanya Tilak essay in Marathi

आज मी तुम्हाला लोकमान्य टिळक निबंध मराठी याचा वर वेगवेगळ्या शब्दांत लिहून देणार. आणि तुम्ही या पैकी कोणताही निबंध तुमच्या परीक्षेमध्ये वापरू शकता. मी आशा ठेवतो आहे का तुम्हाला हे लोकमान्य टिळक निबंध मराठी नक्कीच आवडील.

जर तुम्हाला हे लोकमान्य टिळक निबंध मराठी आवडतो तर तुम्ही एक धाव हे Pavsala nibandh, Majhi aai nibandh किंवा वाचा.

लोकमान्य टिळक निबंध मराठी

लोकमान्य-टिळक-निबंध-मराठी

“स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच!” या घोषणेशी संपूर्ण देश परिचित आहे. ही सिंह गर्जना करणारे लोकमान्य टिळक भारताचे महान नेते होते.

लोकमान्य टिळक १० ओळीत मराठी निबंध

बाल गंगाधर टिळकांचा जन्म २३ जुलै १८५६ रोजी महाराष्ट्राच्या रत्नागिरीतील चिखली गावात झाला.
टिळकांना भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे जनक म्हणून ओळखले जाते.

टिळकांचे राजकीय उद्दीष्ट म्हणजे लोकांसाठी स्वावलंबन आणि स्वराज्य मिळवणे किंवा स्वराज्य मिळवणे हे होते.

त्यांनी स्वदेशी आणि देशभरात मोठ्या प्रमाणावर परदेशी वस्तूंवर बहिष्कार घालण्यात सहभाग घेतला होता.
टिळकांनी लोकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी ‘केसरी’ आणि ‘मराठा’ ही वृत्तपत्रे प्रकाशित केली.
त्यांनी लोकांना एकत्र आणून त्यांना स्वातंत्र्याबद्दल प्रोत्साहीत करण्यासाठी गणेशोत्सव आणि शिवजयंती उत्सवाची सुरुवात केली.

१९०६ मध्ये टिळकांवर राजद्रोहाचा आरोप लावून ब्रिटिशांनी त्यांना अटक केली.मंडालेच्या या कारावासात त्यांनी गीतारहस्य हा ग्रंथ लिहिला.

१९१४ मध्ये कारावासातून सुटका झाल्यानंतर त्यांनी अनेक सामाजिक कार्ये केली.
शेवटी वयाच्या ६४ व्या वर्षी १ ऑगस्ट १९२० रोजी टिळकांना वीरमरण आले.

लोकमान्य टिळक मराठी निबंध (१०० शब्दांत)

बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म २३ जुलै १८५६ मध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली गावात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधरपंत तर आईचे नाव पार्वतीबाई होते. त्यांचे वडील शिक्षक होते. लहानपणापासूनच बाळ टिळक बुद्धिमान आणि तेजस्वी होते. त्यांना कोणावर अन्याय झालेला सहन होत नसे.

१८७९ मध्ये टिळकांनी पुण्याच्या डेक्कन कॉलेजमधून कायद्याची पदवी घेतली. त्यांना ब्रिटीश सरकार सामान्य जनतेवर करत असलेल्या अत्याचाराचा प्रचंड राग येत असे. म्हणूनच त्यांनी १८८० मध्ये स्वातंत्र्यसंग्रामात उडी घेतली. त्यांनी जनतेला स्वातंत्र्याचे महत्व पटवून देण्यासाठी ‘केसरी’ आणि ‘मराठा’ ही वृत्तपत्रे सुरु केली. जनतेला एकत्र आणण्यासाठी त्यांनी गणेशोत्सव आणि शिवजयंती उत्सव सुरु केले. त्यांच्या या कार्यामुळे त्यांना ‘लोकमान्य’ म्हणून ओळखले जाऊ लागले.

स्वातंत्र्य चळवळीत असताना टिळकांना अनेकदा तुरुंगवास भोगावा लागला. मंडालेच्या तुरुंगात असताना टिळकांनी ‘गीतारहस्य’ ग्रंथाची निर्मिती केली. अशा या महान थोरपुरुषाने १ ऑगस्ट १९२० रोजी या भूमीचा निरोप घेतला.

लोकमान्य टिळक मराठी निबंध (२०० शब्दांत)

“स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच! या घोषणेशी संपूर्ण देश परिचित आहे. ही सिंह गर्जना करणारे लोकमान्य टिळक भारताचे महान नेते होते.

टिळकांचा जन्म २३ जुलै १८५६ रोजी महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावात झाला. त्याच्या वडिलांचे नाव गंगाधरपंत आणि आईचे नाव पार्वती होते. लहानपणी प्रत्येकजण टिळकांना ‘बाळ’ म्हणून संबोधत असे. नंतर हेच त्यांचे नाव पडले.

टिळक लहानपणापासूनच हुशार, तेजस्वी आणि धाडसी होते. त्यांना कोणावर अन्याय झालेला पाहवत नसे. टिळकांचे माध्यमिक शिक्षण पुण्यात झाले, त्यानंतर त्यांनी पुण्याच्या डेक्कन कॉलेज मधून आपले पदवीचे शिक्षण घेतले.

त्याकाळात राष्ट्रीय सभा देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढत होती नंतर टिळकही या संघर्षात सामील झाले. लोकमान्य टिळकांनी नेहमीच इंग्रजांच्या अन्याय आणि अत्याचाराला विरोध केला. त्यांना सामान्य लोकांना इंग्रजांच्या अन्यायी शासनाविरुद्ध जागृत करायचे होते. म्हणून त्यांनी लोकांमध्ये स्वातंत्र्याची भूक निर्माण करण्यासाठी केसरी आणि मराठा ही वृत्तपत्रे प्रकाशित करण्यास सुरुवात केली. त्यांनी गणेशोत्सव आणि शिवजयंती यांसारखे उत्सव सुरु करून जनतेला एकत्र आणले.

स्वातंत्र्य चळवळींमध्ये टिळकांना अनेक वेळा तुरुंगातही जावे लागले. मंडालेच्या तुरुंगात त्यांनी गीतेवर भाष्य करणारा ‘गीतारहस्य’ हा ग्रंथ लिहिला. त्यानंतर ते इतके लोकप्रिय झाले की त्यांना लोकांकडून ‘लोकमान्य’ ही पदवी मिळाली.

टिळकांची मंडालेच्या जेलमधून १९१४ मध्ये सुटका झाली, त्यानंतर त्यांनी लोकांच्या कल्याणासाठी अनेक सामाजिक कार्ये केली. टिळकांनी पुण्यात ‘न्यू इंग्लिश स्कूल’ सुरू केले. लोकांना शिक्षणाचे महत्व पटवून दिले.

शेवटी १ ऑगस्ट १९२० रोजी वयाच्या ६४ व्या वर्षी लोकमान्य टिळक या थोर महापुरुषाची जीवनज्योत मावळली.

लोकमान्य टिळक मराठी निबंध (३०० शब्दांत)

लोकमान्य टिळक हे त्या स्वातंत्र्यसैनिकांपैकी एक मानले जातात जे त्यांच्या लढाऊ चेतना, विचारधारा, धैर्य, बुद्धिमत्ता आणि अटल देशभक्तीसाठी ओळखले जातात. ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच’ ही सिंह गर्जना लोकमान्यांनी केली होती.

लोकमान्य टिळक हे केवळ राजकारणी नव्हते तर एक महान अभ्यासक आणि तत्वज्ञ होते. त्यांचे मूळ नाव बाळ गंगाधर टिळक होते. त्यांचा जन्म २३ जुलै १८५६ रोजी महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात चिखली या गावी झाला. त्यांचा जन्म एका मध्यमवर्गी ब्राह्मण कुटुंबात झाला होता.

त्यांच्या आजोबांचे नाव केशवराव होते, ते पेशवे राज्यात उच्च पदावर होते. त्यांच्या आईचे नाव पार्वतीबाई गंगाधर टिळक आणि वडिलांचे नाव रामचंद्र गंगाधरपंत टिळक होते. टिळकांचे वडील गंगाधरपंत हे एक शिक्षक होते. त्यांनी बाळ टिळकांना घरी संस्कृत, मराठी, गणिताचे उत्तम ज्ञान दिले होते.

टिळकांनी १८६६ मध्ये पुण्याच्या एका शाळेत प्रवेश घेतला. टिळक शाळेत असताना खूप आशादायक विद्यार्थी होते. त्याचे शिक्षक, आई, वडील आणि इतरांचा त्यांचा अत्यंत अभिमान वाटायचा. १८७१ मध्ये वयाच्या १५ व्या वर्षी टिळकांचे सत्यभामाबाई नावाच्या मुलीशी लग्न झाले. त्यानंतर त्यांनी डेक्कन कॉलेजमधून कला शाखेचे शिक्षण घेतले.

टिळकांनी १८८० मध्ये राजकारणात प्रवेश केला. त्यांनी वासुदेव बळवंतच्या मदतीने बंडखोरीचा झेंडा फडकावून ब्रिटीश सरकारविरूद्ध निषेध केला. त्यांनी १८८० मध्ये पुण्यात न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली आणि आपले शिक्षण क्षेत्रातील कार्य सुरु केले. त्यानंतर त्यांनी १८८१ मध्ये पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला. त्यांनी जनतेमध्ये स्वातंत्र्याबद्दल जनतेत जनजागृती आणि ब्रिटीश सरकारच्या अन्यायची जनतेला जाणीव करून देण्यासाठी ‘केसरी’ आणि ‘मराठा’ ही दोन वृत्तपत्रे प्रकाशित करण्यास सुरुवात केली.

मराठा केसरी या वृत्तपत्रकाच्या माध्यमातून त्यांनी जनतेची बाजू मांडली होती, त्यामुळे दीड वर्षासाठी त्यांना तुरूंगात जावे लागले. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटी आणि फर्ग्युसन कॉलेजची स्थापना केली. टिळकांनी महाराष्ट्रात गणपती महोत्सव आणि शिवाजी जयंती सुरू करून सार्वजनिक जनतेला एकत्र आणून ऐक्याचा संदेश दिला आणि लोकांमध्ये स्वातंत्र्यप्रेम जागृत केले.

सन १९०६ मध्ये लोकमान्यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली कारावासाची शिक्षा झाली, त्यांना मंडालेच्या तुरुंगात ठेवण्यात आले. त्यांनी येथे वाचन आणि लिखाण करण्यात आपला वेल घालवला. त्यांनी गीतेवर भाष्य करणाऱ्या ‘गीतारहस्य’ ग्रंथाची निर्मिती येथेच केली.

१९१४ मध्ये कारावासातून मुक्तता मिळाल्यानंतर देशाच्या स्वातंत्र्यासाठी झटलेल्या या थोर पुरुषाचे १ ऑगस्ट १९२० रोजी निधन झाले.

लोकमान्य टिळक मराठी निबंध (४०० शब्दांत)

बाळ गंगाधर टिळक हे भारतीय राष्ट्रीय चळवळीचे जनक म्हणून ओळखले जाते. त्यांचे व्यक्तिमत्व बहुआयामी होते. ते समाज सुधारक, स्वातंत्र्यसैनिक, राष्ट्रीय नेते आणि भारत इतिहास, संस्कृत, हिंदुत्व, गणित आणि ते खगोलशास्त्राचे महान अभ्यासकदेखील होते. त्यांना लोकांनी ‘लोकमान्य’ पदवी बहाल केली होती. स्वातंत्र्यलढ्यादरम्यान त्यांनी सिंहगर्जना केली होती, “स्वराज्य माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच” या गर्जनेने कोट्यावधी भारतीयांना स्वातंत्र्यासाठी प्रेरणा दिली होती.

जन्म आणि कुटुंब

बाळ गंगाधर टिळकांचा जन्म २३ जुलै १८५६ रोजी महाराष्ट्रात रत्नागिरीतील चिखली गावात झाला. ते जातीने ‘चितपावन’ ब्राह्मण होते. त्यांचे वडील गंगाधर रामचंद्र टिळक संस्कृत अभ्यासक आणि लोकप्रिय शिक्षक होते. टिळक एक हुशार विद्यार्थी होते आणि गणितामध्ये खूप निपुण होते. लहानपणापासूनच टिळकंच्या मनात अन्याय करणाऱ्याबद्दल रागाची भावना होती. ते स्वभावानेही प्रामाणिक होते आणि त्यांचा सत्यावर आणि प्रामाणिकपणावर विश्वास होता. भारताच्या त्या पहिल्या तरुणांच्या गटात त्यांचा समावेश आहे, ज्यांना आधुनिक महाविद्यालयीन शिक्षण प्राप्त झाले.

शिक्षण

टिळक दहा वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचे रत्नागिरीतून पुण्यात बदली झाली. त्यामुळे टिळकांच्या जीवनात बरेच मूलभूत बदल झाले. पुण्यात त्यांनी डॉ एंग्लो-व्हर्नाक्युलर स्कूलमध्ये प्रवेश घेतला, तेथील नामांकित शिक्षकांकडून शिक्षण घेण्याची संधी त्यांना मिळाली. पुण्यात आल्यानंतर टिळकांना आईच्या निधनाचा आघात सहन करावा लागला आणि जेव्हा ते १६ वर्षांचे होते तेव्हा त्यांच्या वडिलांचाही मृत्यू झाला. तेव्हा टिळक मॅट्रिकची परीक्षा देत होते आणि त्यांचे सत्यभामा या १० वर्षीय मुलीशी लग्न झालेले होते. मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांना डेक्कन कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला.

१८७७ मध्ये बाळ गंगाधर टिळक यांनी गणित विषयातील प्रथम श्रेणीसह कला शाखेत पदवी संपादन केली. त्यानंतरही त्यांनी शिक्षण सुरूच ठेवले आणि कायद्याच्या शिक्षणासाठी एलएलबीची परीक्षाही उत्तीर्ण केली. यानंतर टिळकांनी पुण्यातील एका खासगी शाळेत गणित शिकवण्यास सुरुवात केली.

शैक्षणिक कार्य

त्यानंतर त्यांनी पत्रकाराची भूमिका स्वीकारली. ते पाश्चात्य शिक्षण व्यवस्थेचे कडक टीकाकार झाले आणि ते म्हणत की या शिक्षण प्रणालीच्या माध्यमातून भारतीय विद्यार्थ्यांना दुय्यम पहिले जाते आणि हे भारताच्या अस्मितेसाठी असन्मानपूर्ण आहे. ते निष्कर्षाप्रत आले की चांगले शिक्षण दिले जाईल तेव्हाच सुनागरिक तयार होतील.

त्यांचा असा विश्वास होता की प्रत्येक भारतीयाला भारतीय संस्कृती आणि राष्ट्रीय आदर्शांचे शिक्षण मिळणे आवश्यक आहे. युवांना उच्च संस्कारांचे शिक्षण मिळावे म्हणून टिळकांनी आपले वर्गमित्र आगरकर आणि थोर समाज सुधारक विष्णूशास्त्री चिपळूणकर यांच्यासमवेत ‘डेक्कन एज्युकेशन सोसायटी’ ची स्थापना केली.

स्वातंत्र्य चळवळीतील कार्य

‘डेक्कन एज्युकेशन सोसायटी’ स्थापनेच्या पुढच्याच वर्षी त्यांनी ‘केसरी’ आणि ‘मराठा’ या वृत्तपत्रांचे प्रकाशन सुरू केले. ‘केसरी’ मराठी भाषेचे वृत्तपत्र होते तर ‘मराठा’ हे इंग्रजी भाषेचे साप्ताहिक वृत्तपत्र होते. लवकरच दोन्ही वर्तमानपत्रे अत्यंत लोकप्रिय झाली. टिळकांनी त्यांच्या वर्तमानपत्रात भारताची दुर्दशा विशिष्ट प्रकारे प्रदर्शित केली. वर्तमानपत्राद्वारे त्यांनी लोकांच्या समस्या आणि वास्तविक घटनांचे सजीव चित्रण केले.

प्रत्येक भारतीयाने आपल्या अधिकारांसाठी लढा देण्याचे आवाहन त्यांनी केले. १८९० मध्ये बाळ गंगाधर टिळक हे भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसमध्येही दाखल झाले. ते म्यूनिसिपल कौंसिल पुणेचे सदस्यही होते. टिळक एक महान समाज सुधारकही होते. त्यांनी बालविवाह रोखण्यासाठी आणि विधवा पुनर्विवाहाला प्रोत्साहन देण्यासाठी लोकांना प्रेरित केले. त्यांनी गणेशोत्सव आणि शिवजयंती उत्सवादरम्यान लोकांना एकत्र आणून संघटीत करण्याचे कार्य केले.

तुरुंगवास आणि तुरुंगवासातील कार्य

१८९७ मध्ये टिळकांवर जनतेला ब्रिटिशांविरोधात भडकवत असल्याचा आरोप लावण्यात आला. कोर्टाने त्याला दीड वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावली. १८९८ मध्ये त्यांची जेलमधून सुटका झाली. सुटकेनंतर टिळकांनी स्वदेशी चळवळ सुरू केली. वर्तमानपत्र आणि भाषणांद्वारे टिळकांनी महाराष्ट्रातील प्रत्येक गावात स्वदेशी चळवळीचा संदेश पोहचवला.

दरम्यान, कॉंग्रेस दोन छावण्यांमध्ये विभागली. हे दोन गट जहाल व मवाळ. मवाळांचे नेतृत्व बाल गंगाधर टिळक आणि जहाल लोकांचे नेतृत्व गोपाळकृष्ण गोखले करीत होते. १९०६ मध्ये टिळकांना राजद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. टिळकांना सहा वर्ष तुरुंगवासाची शिक्षा सुनावून मंडालेच्या कारागृहात नेण्यात आले. टिळकांनी तुरूंगात वाचन आणि लिखाण करण्यात वेळ घालवला. बंदिवासात आयुष्य जगताना त्यांनी ‘गीतारहस्य’ हे पुस्तकही लिहिले.

निधन

८ जून १९१४ रोजी टिळकांची सुटका झाली. त्यांची सुटका झाल्यानंतर टिळकांनी कॉंग्रेसच्या दोन्ही गटांना एकत्र करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांच्या प्रयत्नांना विशेष परिणाम दिसले नाही. लोकांच्या हक्कांसाठी लढत लढत १ ऑगस्ट १९२० रोजी लोकमान्य टिळक यांचे वयाच्या ६४ व्या वर्षी निधन झाले.

मी आशा ठेवतो का तुम्हाला हे लोकमान्य टिळक निबंध मराठी नक्कीच आवडला असेल.

Leave a Comment